जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:39 AM2018-04-03T00:39:40+5:302018-04-03T00:39:40+5:30

मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीर घटनादेखील घडलेल्या आहे

The road on the Junk Link Road became a tough one | जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

जत्रा लिंकरोडवरील मार्ग बनला खडतर

Next

आडगाव : मुंबई-आग्रा व औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीचे प्रमुख केंद्र असून, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढत असून, या मार्गावर येणाऱ्या कॉलनीरोड, मुख्य वळणांवर गतिरोधकटाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. जत्रा लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य मार्ग असून, औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांचा वेगदेखील प्रचंड असतो काही दिवसांपूर्वी अपघाताच्या गंभीरघटनादेखीलघडलेल्या आहे शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील रोज होत असतात. या रस्त्यावर झालेले अतिक्र मण, रस्त्यावर केली जाणारी बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. जत्रा चौफुली येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, चेंबरचे ढापे आणि रस्त्यांची लेवेल नसल्याने चेंबर टाळण्याच्या नादात अपघात घडतात. या परिसरात शैक्षणिक संस्था अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा परिसरात राबता असतो शिवाय वाहनेदेखील सर्रासपणे भरधाव वेगाने धावतात. या मार्गावर लॉन्स आणि हॉटेल संख्या अधिक आहे. लग्नसराईत तर वाहने थेट रस्त्यावर उभी असतात. रस्त्यावर होणाºया गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. तरी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. या उपाययोजना गरजेच्या आहे. वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, रस्त्याच्या कडेला उभी राहणारी अनधिकृत वाहनांवर कारवाई करावी, कॉलनीरोड व मुख्य रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावे, रस्त्यावर चेंबर, खड्डे यांची दुरु स्ती करणे गरजेचे आहे.

Web Title: The road on the Junk Link Road became a tough one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.