कलानगरचे रस्ते हरवले चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:31 AM2018-08-14T00:31:41+5:302018-08-14T00:32:04+5:30
दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे खूपच हाल होत आहेत.
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. कलानगर भागात लेन क्रमांक ६ मध्ये एकदंत, शिवसाधना, अवनीश सोसायटी, साईकीर्ती रो-हाउस असून, या वसाहतीपासून मुख्य रस्ता १०० मीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात या रस्त्याने जाताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यातील चार महिने नागरी वसाहतीतील रस्त्याने ये-जा करणे डोकेदुखी आहे. परिसरात काही मोकळे खासगी प्लॉट
पडून असल्याने मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.
कलानगर लेन क्रमांक ६ मध्ये अठरा मीटर रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होते. पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने वाहनधारक तर सोडाच पायी जाणाºया नागरिकांना चिखल तुडवत मार्ग काढावा लागतो. - शेखर घुगे, स्थानिक रहिवासी
कलानगर लेन क्रमांक ६ नवीन वसाहत असून, घंटागाडी नियमित येत नाही. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे चिखलामुळे नागरिकांची वाहने फसतात तर कधी कधी पावसामुळे नागरिक वाहनावरून घसरूनही पडतात. - जयेश भामरे, स्थानिक रहिवासी