देवळालीतील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:58 AM2019-09-26T00:58:28+5:302019-09-26T00:58:45+5:30
देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
भगूर : देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देवळाली छावणी परिषद हद्दितील नागरिकांनी केली आहे.
भगूरलगत देवळाली कॅम्प हद्दीतील उच्चभ्रू वस्ती म्हणून हजारो विविध जाती, धर्माचे नागरिक बंगले, विविध सोसायट्यांमध्ये राहतात, परंतु येथील नागरिकांना बिल्डर अथवा देवळाली छावणी परिषदेने रस्ताच तयार करून दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून चिखलमय परिसर तयार होतो तसेच यातूनच येणे-जाणे करावे लागते.
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक देवळाली छावणी परिषदेला मोठ्या प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी कर भरतात. यात प्रभाग क्र मांक आठ म्हणून नागरिक मतदान करतात व निवडून आलेले प्रतिनिधी फक्त आश्वासन देतात. मात्र रस्त्यांची समस्या सोडवत नाही तर बिल्डर बंगला, सोसायटी, घरांचे लाखो रुपये वसूल करतात. परंतु कुठल्याही सुविधा देत नाही तर दाद कुठे मागावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी येथील नगरसेवकांनी देवळाली छावणी परिषदेत आवाज उठवून डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. समस्या माहिती असूनही रस्ते विकास होत नसल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. याभागात तातडीने रस्ते तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागिरकांनी दिला आहे.
तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी
देवळाली छावणी परिषद वसाहतीमध्ये देवळाली छावणी परिषदेने रस्ताच तयार करून दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून चिखलमय परिसर तयार होतो तसेच यातूनच येणे-जाणे करावे लागते.
४येथील नागरिक देवळाली छावणी परिषदेला मोठ्या प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी कर भरतात. मात्र अनेक गैरसोयी आहेत. रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देवळाली छावणी परिषद हद्दीतील नागरिकांनी केली.