मानेनगरवासीयांना रस्त्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:29 AM2018-08-22T00:29:10+5:302018-08-22T00:29:27+5:30

महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे.

 Road to Mane Nagar waiting for the roads | मानेनगरवासीयांना रस्त्यांची प्रतीक्षा

मानेनगरवासीयांना रस्त्यांची प्रतीक्षा

Next

पंचवटी : महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे. मनपाच्या हद्दीत राहून कर अदा केल्यानंतरही मानेनगरवासीयांना रस्ते, ड्रेनेज यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने प्रशासनाचेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.  तब्बल १५ वर्षांपासून या भागात रहिवासी वस्ती आहे. गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कॉलनीचा विस्तार झाल्याने दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून मानेनगरची ओळख आहे. मानेनगरमध्ये शिवपुष्प, रघुवीर, सुशीलनगरी, कपालेश्वरनगर, रामगडिया, नारायणनगर परिसरांचा समावेश होतो. नागरी वसाहतीत रस्ते असले तरी अद्यापही खडीकरण, डांबरीकरण झाले नाही परिणामी खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. प्रभागात महापालिकेने अनेक भूखंड आरक्षित केलेले असले तरी त्या भूखंडावर उद्यान, सभागृह, व्यायामशाळा नाही.  ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जमण्यासाठी मंदिरात यावे लागते. लोकवस्ती लक्षात घेता लहान मुलांसाठी उद्यान, वाचनालय, अभ्यासिका गरजेची आहे, मात्र प्रशासनाकडून या कामासाठी सध्यातरी कोणतीही तरतूद नाही. मानेनगर वसाहतीत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने शहरात राहून खेडेगावात राहात असल्याचा अनुभव येतो, असे नागरिकांनी सांगितले.
मुख्य रस्त्यापासून पायपीट
मानेनगरला नववसाहतीत शिक्षकवृंद, एचएएल कामगार, शासकीय कर्मचारी राहतात. अनेकांना शहरात बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. मानेनगरकडे येताना रस्ता व्यवस्थित नसल्याने बस, रिक्षा येत नाही त्यामुळे चाकरमाने, शालेय विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते. पावसाळ्यात तर स्कूल व्हॅन चिखलात फसत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते.

Web Title:  Road to Mane Nagar waiting for the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.