मांगबारी ते पिंपळदर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:29 IST2018-09-24T17:29:07+5:302018-09-24T17:29:35+5:30
राज्य महामार्ग क्र मांक सत्तरावरील पिंपळदर ते मांगबारी रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

मांगबारी ते पिंपळदर रस्त्याची दुरवस्था
राज्य महामार्ग क्र. सतरावरून धुळे, नंदुरबार, साक्र ी, दोंडाईचा, येथील भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच हा रस्ता नाशिक येथे जाण्यासाठी जवळचा असल्याने या परिसरातील नागरिक जिल्ह्याच्या कामासाठी ये-जा करतात. परंतु या रस्त्यावरील मांगबारी ते पिंपळदर साधारण दोन कि. मी. रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकाला कसरत कारावी लागते. मांगबारी ते पिंपळदर या रस्त्यावर वळणेही अधिक असल्याने वाहनचालक खड्डे टाळतांना अनेक वेळा वाहने रस्त्याच्या खाली उतरतात. यामुळे या रस्त्यावर लहान मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात. सटाणा ते मांगबारीच्या सहा कि. मी. अंतराचा रस्ता सटाणा विभागाच्या हद्दीत येतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सटाणा सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळदर ते मांगबारी या रस्त्याची दुरस्ती व डागडुजी करण्यात आली. परंतु कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने पावसाळा सुरु होताच खड्डे उघडे पडले. सटाणा ते मांगबारी या रस्त्यावर रस्ता दुरुस्ती व डागडुजीसाठी लाखो रूपये खर्च होऊनही रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्याने याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.