मेहेर ते अशोकस्तंभ रस्ता आज सायंकाळनंतर खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:01 AM2019-09-01T01:01:25+5:302019-09-01T01:01:47+5:30
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे.
नाशिक : नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहेर ते अशोकस्तंभ हा रस्ता रविवारी (दि.१) सायंकाळपासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अवघ्या १.१ किलोमीटर रस्त्याचे पथदर्शी स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्याचे काम २१ कोटी रुपयांत करण्यात येणार आहे. परंतु हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ३१ मार्च रोजी रस्त्याच्या कामाला दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला ३६ हजार रुपये प्रतिदिन दंड करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा दंड करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने ३१ आॅगस्टपर्यंत करण्यात रस्ता खुला होईल, असे सांगितले जात होते. परंतु काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. संबंधित ठेकेदारास १६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले असले तरी स्मार्ट सिटी कंपनीने त्याचा इन्कार केला आहे. ठेकेदाराची मुदत ३१ मार्च रोजीच संपली असून, आता केवळ लवकरात
कॉँक्रिटरोडवर डांबरीकरण... याला म्हणतात ‘स्मार्ट’
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग तातडीने खुला करावा यासाठी नागरिक सतत मागणी करीत आहे. त्यातच रखडलेल्या या मार्गावरूनच गणेशोत्सव मिरवणूक जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मेहेर सिग्नलजवळ काँक्रिटीकरणावर चक्क डांबर टाकून काम करण्यात आले असून, त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात, सदरचे काम बाकी असून, रस्त्यावर खड्डे पडल्याने गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकण्यात आल्यचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला आहे.