नायगाव ते सायखेडा रस्ता बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:05+5:302021-09-27T04:15:05+5:30
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून या रस्त्याने २४ तास वाहनांची वर्दळ असते. या बारा ...
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून या रस्त्याने २४ तास वाहनांची वर्दळ असते. या बारा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहन चालक हे खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा छोटे- मोठे अपघात घडण्याचे प्रकारही घडत आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाचे पाणी साचून दिवसेंदिवस मोठे होत आहेत. तसेच साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यानेही अपघात होत आहेत. तर मोठ्या गाड्यांमुळे अंगावर पाणी उडण्याच्या प्रकारामुळे वाद घडत आहेत. साचलेल्या पाण्यामुळे चांगला रस्ता फुटण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
या रस्त्यावरील खड्डे संबंधित बांधकाम विभागाने लवकरात लवकर बुजवून वाहन चालक व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असलेला रस्ता आणखी खराब होण्यापासून वाचविण्याची मागणी नायगाव खोऱ्यातील शेतकरी व प्रवाशांनी केली आहे.
काेट....
सायखेडा व लासलगाव कांदा मार्केटला जाण्यासाठी शेतकऱ्यांना जवळचा एकमेव मार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक खड्डे पडल्याने हा रस्ता वेळखाऊ व त्रासदायक बनला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्यात यावेत. खड्ड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे रस्ता दिवसेंदिवस आणखी खराब होत आहे.
- समीर अत्तार, वाहन चालक, नायगाव.
फोटो - २६ नायगाव रोड
नायगाव-सायखेडा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये अशा प्रकारे पाणी साचून रस्ता आणखी खराब होत आहे.
260921\26nsk_3_26092021_13.jpg
फोटो - २६ नायगाव रोड