कांदाप्रश्नी राष्ट्रवादीतर्फे रेल रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:08 PM2018-11-27T13:08:54+5:302018-11-27T13:11:25+5:30
लासलगाव : कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी येथे नाशिक जिल्हा राष्ट्रवादीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले.
ला सलगाव : कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्यासह अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी येथे नाशिक जिल्हा राष्ट्रवादीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आले.कांद्याचे निर्यात मुल्य शून्य असतांना देखील कांद्याला १५० ते २०० रु पये एवढी कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतमालाचे दर वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे सद्यस्थितीत कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली.यावेळी महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार, डॉ.सयाजी गायकवाड, अमृता पवार, बबन शिंदे, बाळासाहेब लोखंडे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शहाजी भोकनळ इतर मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश आव्हाड, वक्ता प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल सालगुडे आदींची भाषणे झाली. यावेळी कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे स्थानकावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रेल्वे रोको सुरु असतांना आंदोलकांकडून युती सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.