मार्ग प्रगतीचा : तब्बल १२ हजार कोटींच्या राष्टÑीय महामार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा सुरत ते नगर सागरमाला प्रकल्पातील महामार्ग जाणार नाशिकमधून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 01:08 AM2020-07-23T01:08:55+5:302020-07-23T01:09:11+5:30
नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले.
नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यासाठीच्या मार्गाचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील काही भाग दिंडोरी तालुक्यासह ओझर, आडगाव येथील मुंबई -गोवा महामार्गावरून निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यांमधून जाणार आहे.
केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भारत सरकारचा एक व्यूहात्मक पुढाकार आहे. त्याचा उद्देश समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करणे असा आहे. भारताच्या विकासामध्ये समुद्रीकिनाऱ्यांचे अधिकाधिक योगदान मिळवण्याच्या प्रयत्नांचा तो भाग आहे. त्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या समुद्री बंदरांचा जागतिक दर्जाच्या बंदरात विकास करण्यासह बंदरांचा,औद्योगिक क्षेत्राचा आणि त्यासाठी दोन टोकांना जोडणाºया महामार्गाचा एकात्मिक विकास करणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. बंदरात आलेला माल वेगवेगळ्या महामार्गांनी सर्वदूर पाठवणे सहजसुलभ व्हावे, असादेखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यासाठी भारतातील १२ बंदरे व १२०८ बेटे विकसित करण्यास केंद्र शासनाने पूर्वीच परवानगी दिली असून, सर्व बंदरांना महामार्गाद्वारे जोडण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत २०२५ सालापर्यंत एकूण ३५ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्र मानंतरचा हा देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे.
या प्रकल्पासाठी ‘सागरमाला विकास कंपनी लिमिटेड’ या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून, त्याअंतर्गतच या महाकाय प्रकल्पाची रुपरेषा आखून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा सागरमाला महामार्ग सुरतहून निघाल्यावर नाशिक, नगर पुढे पुणे, सोलापूर जिल्ह्णातून आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूत दक्षिणेकडील समुद्रतटाला जाऊन मिळणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत-मुंबईदरम्यानची वाहतूक तसेच मुंबई-पुणेदरम्यानच्या अवजड मालवाहतुकीला काही प्रमाणात आळा घालणेदेखील शक्य होणार आहे.