छेड काढणारे सडकसख्याहरी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:04 AM2017-08-10T01:04:26+5:302017-08-10T01:04:34+5:30
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात विशेष करून महाविद्यालय व शाळा परिसरात रोडरोमिओंकडून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असून, याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचाºयांच्या माध्यमातून शाळा तसेच महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या टपोरींवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत महाविद्यालय पाठोपाठ शाळेच्या विद्यार्थ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले मुख्य चौक, गर्दीचे ठिकाण, विशेष करून शाळा व महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनींची छेडछाड करणाºया टपोरींना पोलिसांनी लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने याला आळा बसावा यासाठी अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी महिला पोलीस कर्मचाºयांची छेडछाडविरोधी पथकाची नेमणूक केली आहे. या पथकात चक्क महिला पोलीस कर्मचारी ह्या शाळेच्या तसेच महाविद्यालयाच्या आवारात साध्या वेशात विद्यार्थिनी म्हणून परिसरात वावरत आहेत. या साध्या वेशातील महिला पोलीस असलेल्यांना विद्यार्थिनी समजून महाविद्यालयाच्या व शाळेच्या आवारात टपोरीपणा करणाºयांनी महिला पोलिसांचीच छेडछाड केल्याने त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले. सिडको महाविद्यालयातील १७ व उंटवाडी येथील शाळेच्या आवारात टपोरेगिरी करणाºया १५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेत त्यांना ताकीद देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पाच सराईत गुन्हेगार तडीपार करण्याचा प्रस्ताव गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू करण्यात आली असून, पोलिसांनी खून, अपहरण, हाणामारी करणाºया १२ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत कारवाईचा बडगा सुरू केला आहे. सण-उत्सवाच्या काळात गोंधळ तसेच त्रासदायक काम करणाºयांची गय केली जाणार नसून पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पाच सराईत गुन्हेगारांना तडीपारीची नोटीस दिली असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.