रस्त्यांच्या दुरुस्तीने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:55 PM2019-01-30T23:55:08+5:302019-01-30T23:55:57+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पठावा रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. पठावा रस्त्याला काटेरी झुडपांचा
वेढा तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्त्यावर अनेकदा लहान-मोठे अपघात घडत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली काटेरी झुडपे काढण्यात आली व ठिकठिकाणचे खड्डे बुजविण्यात
आले आहेत.दोन्ही रस्त्यांची कामे मार्गीपश्चिम पट्ट्यातील रस्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाले होते. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर काही दिवसांतच रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.
डांगसौंदाणे रस्ता, बागलाण तालुक्यातील देवस्थान श्रीक्षेत्र कपालेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
डांगसौंदाणे व कपालेश्वर रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेली काटेरी झुडपे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत.