धोंगडे नगरमधील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:56 PM2021-06-28T23:56:21+5:302021-06-28T23:56:47+5:30
नाशिकरोड : धोंगडे नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न केल्यामुळे या खड्ड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि धोंगडे नगर मित्रमंडळाने वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध केला होता. त्याची दखल घेत प्रशासनाने रस्ते दुरुस्तीला सुरूवात केली आहे.

धोंगडे नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे फक्त माती टाकून बुजवल्याने पावसाचे पाणी पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते तसेच खड्ड्यातील माती पावसाच्या पाण्यामुळे बसून गेल्याने खोलगटपणा निर्माण झाला होता.
मनपा प्रशासनाला सांगूनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ धोंगडे नगर मित्रमंडळाचे अतुल धोंगडे, अतुल उपाध्ये, बाळासाहेब धोंगडे, उषा डहाके, मुक्ताबाई धोंगडे, भगवंत रामणानी, गीता सिंग, कुसुम गायधनी, सवित चव्हाण, प्रशांत भालेराव, नयन धोंगडे, अतुल चव्हाण, शिवा धोंगडे, उदय जोशी, मयूरेश भालेराव, गौरव हांडोरे, यश हारदे, सचिन कुलथे, स्वप्निल कराड आदींनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले होते.
मनपा प्रशासनाने ज्येष्ठांच्या आंदोलनाची दखल घेऊन आठ दिवसांमध्ये धोंगडे नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये व्यवस्थितपणे दगड टाकून डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.