दिंडोरीतील रस्ता दुरुस्तीचे अखेर काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:47 PM2020-11-23T23:47:16+5:302020-11-24T02:13:46+5:30
दिंडोरी : तालुक्यातील वागदेव फाटा ते परनॉर्ड रिकार्ड कंपनी या तीन किमी अंतराच्या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कादवा, माळुंगी, म्हेळुस्के, ओझे, करंजवण येथील वाहनचालकासह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर या खराब रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तेथील परनॉर्ड रिकार्ड इंडिया या कंपनीने नुकतेच चालू केले आहे. या रस्ता दुरुस्तीमुळे काही प्रमाणात का होईना वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

वागदेव फाटा ते परनॉर्ड रिकार्ड कंपनी कादवा, माळुंगी, म्हेळुस्के, ओझे, करंजवण या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची भाजीपाला वाहतूकही याच रस्त्याने होत असते. करंजवणपासून दिंडोरीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. मात्र म्हेळुस्के फाटा ते कादवा, म्हाळुंगी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब असल्यामुळे सध्या या रस्त्यावरील वाहतूक कमी झालेली आहे. सुमारे आठ किमी अंतराचा रस्ता नवीन केल्यास खेडले, पिंपरखेडसह पश्चिम भागांमध्ये जाण्यासाठी खूप जवळचा मार्ग आहे. यासाठी हा रस्ता होण्याची आवश्यकता आहे.
दिंडोरी तालुक्यातील परनॉर्ड रिकॉर्ड कंपनी येथील रस्त्याची दुरुस्ती करत असते. त्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.