औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:53 PM2020-09-14T15:53:24+5:302020-09-14T15:54:29+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स्त केल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याधारक व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स्त केल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याधारक व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्यावरीलखड्यांबाबातअनेक वेळा येथील शेतकरी व कंपन्यांनी ग्रामपंचायतींना सांगितले होते. परंतु हा शिव रस्ता असल्याने जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायत रस्ते दुरु स्त करत नव्हते. त्यामुळे हा शिव रस्ता खूप खराब झाला होता.व दोन्ही ग्रामपंचायत एक मेकाकडे बोट दाखवून दिवस काढत होते.
यावेळेस जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश तिडके व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतचे सदस्य तुकाराम जोंधळे या दोघांनी पुढाकार घेऊन व दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रातील शिवरस्ता दुरु स्त करण्याचे ठरवले व रस्त्याचे काम सुरू करून मुरूम व खडी टाकून रस्ता दुरु स्त करण्यात येत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपनी धारक व आजूबाजूच्या शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.
जानोरी व जऊळुके दिंडोरी शिवारातील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अतिशय खराब झाले होते. परंतु दोन्ही ग्रामपंचायतीचा शिवरस्ता असल्याने तो कोण दुरु स्त करेल याकडेच वाट बघत राहिले. परंतु या वेळेस आम्ही दोन्ही ग्रामपंचायतीने एकत्र येऊन रस्ते दुरु स्त करण्याचे ठरवले.
- गणेश तिडके, उपसरपंच, जानोरी.
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना ग्रामपंचायतीने सुविधा दिल्या पाहिजे म्हणून आम्ही जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन औद्योगिक कंपन्यांच्या रस्त्यावर खडी व मुरूम टाकून दुरु स्त करण्यात येत आहे.
- तुकाराम जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य, जऊळुके, दिंडोरी.
(फोटो 14 जानोरी 2, 3)
1) रस्त्याची पाहणी करताना जानोरी उपसरपंच गणेश तिडके व ग्रामपंचायत सदस्य जऊळुके दिंडोरी तुकाराम जोंधळे.