रस्ता लुटीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:29 AM2018-04-20T00:29:48+5:302018-04-20T00:29:48+5:30

मालेगाव : संशयितांकडून सव्वालाखाचा मुद्देमाल जप्तमालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Road robbery arrested four | रस्ता लुटीप्रकरणी चौघांना अटक

रस्ता लुटीप्रकरणी चौघांना अटक

Next
ठळक मुद्देभाऊसाहेब बहुरे व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन ६७ हजारांचा मुद्देमाल, शेख दाम्पत्याला मारहाण करुन ३६ हजार भंगार विक्रेते शेख रफीक शेख लतीफ लोखंडी टॉमीने मारहाण करुन रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला


मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांची लूट करणारे चौघे जण व जप्त मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.
 

मालेगाव : संशयितांकडून सव्वालाखाचा मुद्देमाल जप्तमालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर प्रवाशांना लुटणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मालेगाव - चाळीसगाव रस्त्यावर गेल्या १६ एप्रिल रोजी पिंजारपाडे येथील भाऊसाहेब बहुरे व त्यांच्या पत्नीला मारहाण करुन ६७ हजारांचा मुद्देमाल, १७ एप्रिलला चाळीसगाव येथील शेख दाम्पत्याला मारहाण करुन ३६ हजार तर पिलखोड येथील भंगार विक्रेते शेख रफीक शेख लतीफ लोखंडी टॉमीने मारहाण करुन रोकड, सोन्याचे दागिने, मोबाईल असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीमान करत भगवान सीताराम करगळ (२५) रा. सवंदगाव याला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने साथीदार काळू तुकाराम शिंदे रा. कजवाडे, विठोबा रामचंद्र वायकर, बबन चैत्राम महानोर दोघे रा. खालचे टिपे अशा चौघांनी प्रवाशांना मारहाण करुन लुटमार केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी, मोबाईल, दागिने, रोकड असा एक लाख २६ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक संदीप दुनगहू, राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, रतिलाल वाघ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने केली.

Web Title: Road robbery arrested four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा