चांदोरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:07 PM2021-02-08T19:07:56+5:302021-02-09T00:49:11+5:30

चांदोरी : येथील के.के. वाघ वरिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ, प्राचार्य डॉ. आर.के. दातीर उपस्थित होते.

Road safety awareness rally at Chandori | चांदोरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली

चांदोरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली

Next

विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर सामाजिक जीवन विकासाविषयक माहिती देणे ही काळाची गरज बनत चालली आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांच्या रस्ता सुरक्षिततेची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सायखेडा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क रस्ता सुरक्षा सप्ताह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतूक सुरक्षा जनजागृतीबाबत विविध प्रकारच्या घोषणा दिल्या व सुरक्षिततेचे संदेश देणाऱ्या फलकांद्वारे माहिती दिली. विद्यार्थी, शिक्षक व पोलीस अधिकारी यांच्या मार्फत नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विनाहेल्मेट व तिहेरी प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना चॉकलेट देऊन गांधीगिरीद्वारे रस्ते सुरक्षाचे व हेल्मेटवापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल गीते व नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.बी. पोटे, प्रा. पी.पी. आहेर, प्रा. बी.बी. कोल्हे उपस्थित होते.

Web Title: Road safety awareness rally at Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.