विंचूर येथे रस्ता सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 03:09 PM2019-02-11T15:09:42+5:302019-02-11T15:09:49+5:30
लासलगाव :- वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरु पाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने लक्ष देतात येते साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्य सार्थ करू शकतो, असे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या निमित्ताने विंचूर येथे कार्यक्र मात मोटर वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी आवाहन केले.
लासलगाव :- वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास गंभीर स्वरु पाचे अपघात होणार नाहीत. वाहतूक नियमनासाठी स्वयंस्फूर्तीने लक्ष देतात येते साधे नियम पाळूनही आपण ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ हे ब्रीद वाक्य सार्थ करू शकतो, असे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गाड्यांना रिफ्लेक्टर लावण्याच्या निमित्ताने विंचूर येथे कार्यक्र मात मोटर वाहन निरीक्षक अनिल धात्रक यांनी आवाहन केले. यावेळी बाजार समितीचे सदस्य पंढरीनाथ थोरे, रमेश पालवे, अनंता सावंत उपस्थित होते. या अभियानामध्ये वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती येथील महावीर विद्यालयातील अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विरु ध्द दिशेने प्रवास करणार नाही, मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही , निष्कारण हॉर्न वाजविणार नाही, अतिवेगाने गाडी चालविणार नाही, घातक पध्दतीने ओव्हरटेक करायची नाही यासह वाहतूक नियमाचे धडे देताना आपली सुरक्षा किती महत्वाची आहे हे धात्रक यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड ,संचालक महावीर चोपडा ,मुख्याध्यापक दिलीप डुंगरवाल , अनंता सावंत , मधुकर बोडके ,नीलेश दायमा ,राजेंद्र जैन , हर्षदा कदम उपस्थित होते .