लोकसहभागातून रस्त्याची डागडुजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:30 PM2019-12-17T14:30:51+5:302019-12-17T14:31:05+5:30
उमराणे : येथील गणपती मंदीर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लोकसहभागातून पूर्ण केल्याने ग्रामस्थानी जाणता राजा मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्र माबाबत समाधान व्यक्त केले.
उमराणे : येथील गणपती मंदीर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्याच्या दुरूस्तीचे काम लोकसहभागातून पूर्ण केल्याने ग्रामस्थानी जाणता राजा मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्र माबाबत समाधान व्यक्त केले. येथील कसमादे परिसरातून शेतमाल विक्र ीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणा-या वाहनांना गावातील अरु ंद रस्त्यानी जावे लागत होते. त्यामुळे वाहनधारक व नागरिक या दोघांनाही त्रास सहन करावा होता.ही अडचण लक्षात घेत सन २००५ साली शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून या वाहनांसाठी बाह्य वळण रस्ता निर्मिती करण्याचा संकल्प जाणता राजा मित्र मंडळातर्फे धनदाई माता मंदिर ते गणपती मंदिर असा गावाबाहेरु न नविन रस्ता तयार करण्यात आला.या रस्त्यामुळे .बाजार समितीकडे जाणारी सर्व वाहने गावाबाहेरून जाऊ लागल्याने नागरिकांची व वाहनचालकांची अडचण दुर झाली आहे. परंतु चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदींना पुर येऊन या पूर पाण्यामुळे हा रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले होते. परिणामी वाहतुकीस अडथळे निर्माण होऊन छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले होते. ही बाब लक्षात घेऊन जाणता राजा मित्र मंडळाने जंजिरा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या शुर योद्धा कोंडाजी फर्जद यांच्या स्मरणार्थ सदर रस्ता दुरु स्तीचे काम त्वरित हाती घेऊन पूर्ण केल्याने उमराणे ग्रामस्थांच्यावतीने मंडळाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.