पाणीपुरवठ्यासाठी दोन गावांच्या सरपंचांनी स्वखर्चाने केला रस्ता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:32 PM2018-12-09T17:32:16+5:302018-12-09T17:32:31+5:30

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.

Road to self-purchase by two village Sarpanchs for water supply | पाणीपुरवठ्यासाठी दोन गावांच्या सरपंचांनी स्वखर्चाने केला रस्ता.

पाणीपुरवठ्यासाठी दोन गावांच्या सरपंचांनी स्वखर्चाने केला रस्ता.

Next

येवला : तालुक्यातील ३६गावे व २६ वाड्यांना २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र ज्या विहिरीवर टँकरमध्ये पाणी भरले जाते, त्या विहिरीवर रांत्रिदवस प्रतिक्षा करु नही टँकरची दुसरी खेप भरली जात नसल्याने दुसऱ्या विहिरीवरु न टँकर भरले जावे, यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठेचे सरपंच योगेश इप्पर यांनी त्या विहिरी पर्यंत स्वखर्चाने रस्ता तयार करु न दिला.
यंदा पावसाळा संपला तरी पाण्यासाठीची भटकंती थांबलीच नाही. बाभुळगाव शिवारातील नांदुर ग्रामपंचायीच्या विहिरीवरु न पाणी पुरवठा सुरु आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असणाºया प्रत्येक गावाला टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच टँकर पाणी येत असल्याने पाणी टंचाईची समस्या उग्र रु प धारण करीत होती. गावेगावच्या विहिरींनी तळ दाखवल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र एका गावाला एका टँकरच्या दोन खेपा अपेक्षीत असताना एकच खेप होत असल्याने वांरवार तक्र ार करु नही टँकरने दुसरी खेप येत नव्हती. टँकरची एकच खेप का येते याची चौकशी करण्यासाठी कोळमचे सरपंच सोपानराव चव्हाण व खिर्डी साठे येथील सरपंच योगेश इप्पर यांनी टँकरचा माग काढुन जेथे टँकर भरले जातात, तेथे जाउन पाहणी केली असता एकाच विहिरीवरु न टँकर भरले जात असल्याचे लक्षात आले. एक टँकर भरण्यासाठी अंदाजे दिड ते दोन तास लागत असल्याने टँकर भरायला वेळ वाया जातो. त्यामुळे टँकर उपलब्ध असूनही एका टँकरच्या एका दिवसात दोन खेपा होत नाहीत.

Web Title: Road to self-purchase by two village Sarpanchs for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी