पूर्व भागातील रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:10 AM2019-10-28T00:10:46+5:302019-10-28T00:11:13+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघात होत आहे. ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद या रस्त्यांकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरेगाव ते डर्क इंडिया कंपनीपर्यंतचा रस्ता, एकलहरे शिवरस्ता, गंगावाडी ते कालवी, हिंगणवेढे-दारणासांगवी शिवरस्ता, एकलहरे सिद्धार्थनगर चाडेगाव व्हाया सामनगाव रस्ता, चाडेगाव जाखोरी व्हाया कोटमगाव मुख्य रस्ता, कोटमगाव ते ओढा जिल्हा प्रमुख मार्ग, ओढा ते दहावा मैल, सामनगाव ते आडगाव या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची डागडुजी न झाल्याने डांबर उखडून खडी उघडी पडली आहे. तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.
एकलहरे-हिंगणवेढे-सांगवी हा शिवरस्ता मळे भागातून जातो. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्र मण केल्याने अरुंद झाला आहे. दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाही, त्यामुळे वाहनचालकांमध्ये हमरी-तुमरी होते. हा रस्ता जिल्हा नियोजन मंडळ किंवा तत्सम यंत्रणेमार्फत दुरु स्त करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. एकलहरे गावापासून डर्क इंडिया कंपनीपर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडून पाणी साचते. दरवर्षी मुरूम टाकून खड्डे बुजविण्यासाठी हजारो रु पये खर्च केले जातात. मात्र रस्ता पुन्हा ‘जैसे थे’ होतो. हा रस्ता वीज मंडळाच्या अखत्यारीत असल्याने सी.एस.आर. योजने अंतर्गत कॉँक्रि टीकरण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. जुने सामनगाव ते आडगाव हा रस्ता नाशिक-औरंगाबाद, मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे महामार्गाला मिळणारा ग्रामीण भागातील महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे. जुने सामनगाव, कोटमगाव, विंचूर गवळी ते आडगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत आहे. या भागातील रहिवासी, ग्रामस्थ, शेतकरी यांना दररोज त्रास सहन करावा लागतो.
चाडेगाव-सामनगाव रस्त्याचे काम संथ
चाडेगाव ते एकलहरे सिद्धार्थनगर व्हाया सामनगाव या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, हा रस्ता कधी पूर्ण होणार असा सवाल सामनगावकर एकमेकांना विचारत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झाला आहे. रस्त्यावरील पाच ठिकाणच्या मोºयांचे काम व काही ठिकाणी खडी पसरून रस्ता सपाट करण्यात आला. मात्र सामनगाव ते एकलहरे गेटपर्यंत रस्त्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे सामनगावचे रहिवासी, शालेय विद्यार्थी, वाहनधारक, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता खडबडीत झाल्याने अनेक दुचाकीचालक व पाठीमागे बसणाºया महिलांना पाठीचे व मणक्यांचे आजार जडले असल्याची महिलांची तक्र ार आहे. हा रस्ता त्वरित पूर्ण करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पुलाचीही दुरवस्था
एकलहरे भागातील नागरिकांना जण्यासाठी ओढा गावाजवळ गोदावरी नदीवर फरशी वजा पूल बनविण्यात आला आहे. या पुलावरही पुराच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूने चढणीचा रस्ता आहे. तोही खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत धरून खड्डे चुकवत वाहने चालविण्याची कसरत करतात.