सोनगाव ते करंजगाव रस्त्याची खड्ड्यांनी झाली दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:55 PM2020-08-17T15:55:30+5:302020-08-17T15:56:06+5:30
सायखेडा : सोनगाव येथील कारेवस्ती ते शिंगवेपुढे करंजगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.
सायखेडा : सोनगाव येथील कारेवस्ती ते शिंगवेपुढे करंजगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत.
सोनगाव ते करंजगाव हा दोन गावांना जोडणारा रस्ता गोदाकाठ भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर अनेक कांदा व्यापार्?यांच्या वखारी आहे. सायखेडा येथील कृषी उत्पन्न बाजार समतिीच्या आवारातून लिलाव झालेल्या कांद्याच्या गाड्या खाली करण्यासाठी शेतकरी या वाखारी मध्ये येत असतात, तसेच या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी असल्याने शेतीतील भाजीपाला आण िइतर वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असते. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकर्यांच्या कांदा विक्र ीसाठी आलेल्या ट्रॅक्टर आण िपिकप या गाड्या सतत वाहतूक करत असतात. व्यापार्?यांच्या देखील मालवाहतुकीसाठी येणार्या मोठ्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्याचा त्रास परिसरातील शेतकर्यांना आण िनागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या तक्र ारी शेतकर्यांनी केल्या आहे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार तक्र ारी केल्या आहे. नागरिकांनी अनेक वेळा रस्ता बंद केला लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून तात्पुरत्या आश्वासन या रस्त्याच्या संदर्भात देण्यात येते, मात्र त्या आश्वासनांचा पुन्हा विसर पडत असल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी नागरिकांची पूर्ण होत नाही संबंधित रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रस्ता तात्काळ दुरु स्ती करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सोनगाव येथील कारे वस्ती ते करंजगाव या रस्त्याचे शिंगवे शिवारात मोठ्या प्रमाणामध्ये दैन्यावस्था झाली आहेत प्रचंड खड्डे पडले आहे. कांद्याच्या निमित्ताने अनेक शेतकर्यांची दररोज या रस्त्याला वर्दळ असते तसेच व्यापार्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात वर्दळीचा रस्ता असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत नाही नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
- कैलास डेर्ले, शिंगवे.