‘रस्त्यांची झाली चाळण, श्रेयवादाचे मोडा वळण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:23 AM2018-03-14T01:23:02+5:302018-03-14T01:23:02+5:30
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीला जोडणारा महामार्ग ते बाजार समिती या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. बाजार समितीचे सभापती व माजी आमदार दिलीप बनकर यांनी प्रसिध्दीपत्रक काढून रस्त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मंजूर केला असल्याचे नमूद केले. यावर आमदार अनिल कदम समर्थकांनी तत्काळ पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले, तर भाजापाच्या पदाधिकाºयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यात भाजपाचे शासन असून बांधकाम खातेही भाजपाकडे असल्यामुळे हे भाजपाचेच श्रेय असल्याचा दावा करून या श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली आहे.
श्रेयवादावरून सुरू झालेल्या या लढाईत पिंपळगावातील मयूर गावडे या नागरिकाने ‘श्रेय वाद सोडा, आधी रस्ता पूर्ण करा’ मगच श्रेय घ्या़़़, रस्त्यांची झाली चाळण, श्रेयवादाचे मोडा वळण अशा आशयाचा फलक लावल्याने तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.