रस्ते सुरेगाव विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:41 PM2018-12-22T17:41:21+5:302018-12-22T17:42:09+5:30
येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव विविध सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.
येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव विविध सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.
रस्ते सुरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवस २१ डिसेंबर होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदतीत सर्वसाधारण जागेकरीता आठ, महिला दोन, इतर मागास प्रवर्ग एक , एकअनुसूचित जाती जमातीएक , भटक्या विमुक्त एक अशाप्रकारे १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्यात आलेला होता. मात्र भटक्या-विमुक्त साठी एकही अर्ज दाखल झाला नाही.
बाबा डमाळे, सुधाकर ढमाले, माधव गायके, राजेंद्र पवार, संतोष साबळे, गजानन चव्हाण, शेकूनाथ तुपे, बापू मोरे हे सर्वसाधारण तर महीला रुक्मिणी आहेर, सिंधु आसने, इतर मागास प्रवर्ग विठ्ठल गायकवाड तर पोपट पगारे अनुसूचित जाती अशा प्रकारचे बारा अर्ज दाखल झाले. केवळ बाराच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. येवला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी एस. एस. परदेशी व चंद्रभान वाकचौरे यांनी या निवडणुकीचे कामकाज पार पाडले.
सुरेगाव रस्ता विकास संस्था बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे बाबा डमाळे, हरिभाऊ भागवत, राजाभाऊ ढमाले, प्रकाश गायके, बाबासाहेब पवार, नंदू ढमाले, बाबासाहेब पगारे, ज्ञानेश्वर धुमाळ , शरद पवार, मुसाभाई शहा, गणेश चव्हाण, संतोष आहेर, रामनाथ ढमाले, रमेश गायकवाड, राजेंद्र पगारे, ज्ञानदेव पवार, कैलास आवटे, देविदास गायकवाड , अशोक पवार, भास्कर पवार, चांद शेख, चंदू आसणे, बालम शेख आदींनी प्रयत्न केले.