ताहाराबाद ते नामपूर रस्ता होणार रुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:46+5:302021-04-24T04:14:46+5:30
बागलाण या आदिवासी विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे ...
बागलाण या आदिवासी विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे व धावपट्टीच्या कडा तुटल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन लहान-मोठ्या अपघातांना स्थानिक जनतेला सामोरे जावे लागते. मतदारसंघातील रस्ते प्राधान्याने केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजूर करावेत, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रस्त्याचे अहवा -ताहाराबाद-नामपूर-लखमापूर असा २४ किलोमीटरचा रस्ता रुंद होणार आहे. हा रस्ता सध्या ७ मीटर रुंद असून, तो आता १० मीटर रुंद होणार आहे. तसेच ब्लँक स्पॉटदेखील काढले जाणार आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. लवकरच या कामाची निविदा निघून कामाला सुरुवात होणार आहे.