सुकेणे येथे रेल्वे पुलाखालील रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 01:28 AM2019-09-15T01:28:14+5:302019-09-15T01:28:29+5:30
कसबे सुकेणे येथील मध्य रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेने तयार केलेल्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, चिखल-गाळाने चाळण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे त्वरित कॉँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कसबे सुकेणे : येथील मध्य रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेने तयार केलेल्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, चिखल-गाळाने चाळण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे त्वरित कॉँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कसबे सुकेणे येथील रेल्वेस्थानकाजवळ ओझर-सुकेणे-पिंपळस जिल्हा मार्गावर असलेले रेल्वे फाटक रेल्वेने बंद करून त्याऐवजी जवळच असलेल्या बाणगंगा रेल्वे पुलाखालून रस्ता तयार केला आहे. अर्धवट रस्ता रेल्वेने वाहतुकीसाठी खुला केल्याने या रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुर्दशा झाली असून, मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठा गाळ तयार झाला असून, दुचाकीस्वार घसरत आहेत. रेल्वेने या रस्त्यावर त्वरित काँक्रि टीकरण करावे किंवा रेल्वे फाटक पुन्हा सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.