वडाळागावातील वाहतुकीचा रस्ता मोकळा झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:25 AM2019-04-27T00:25:54+5:302019-04-27T00:26:12+5:30
वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती.
इंदिरानगर : वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती. या लोकमत वृत्ताची संबंधित युवकांनी दखल घेत सकाळी लोखंडी पाइप काढून वाहतुकीचा रस्ता मोकळा केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वडाळागावातील सावित्रीबाई फुलेनगर, सादिकनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात. त्यामध्ये हातावर काम करण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शहरात कामानिमित्त व व्यवसायानिमित्त ये-जा करण्यासाठी राजवाड्यातील रस्त्याने ये-जा करावी लागते, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेथील काही युवकांनी सदर रस्त्यावर लोखंडी पाइप लावून रस्ता अनधिकृत बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांबून फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे होणाºया गैरसोयींमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नागरिकांनी केला होता.
शुक्र वार (दि.२६) रोजी लोकमत वृत्ताची दखल घेत आणि संबंधित विभागांकडून कारवाई होण्याच्या आत संबंधित युवकांनी सकाळी लोखंडी पाइप व त्यासाठी उभारण्यात आलेला स्टँड काढून वाहतुकीचा रस्ता मोकळा केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.