दहा तरुणांनी श्रमदानातून तयार केला रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 04:58 PM2021-06-15T16:58:22+5:302021-06-15T16:58:56+5:30
नांदगाव : वस्ती शिवार रस्त्यासाठी दहा वर्षे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही रस्ता झाला नाही. म्हणून दहा तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दहा फुट रुंद व दीड किमी लांबीचा रस्ता श्रमदानाने तयार केला. जळगाव बु ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता तयार करण्यात आला.

रस्ता नसल्याने पावसाळ्यात व इतर हंगामात शेतमालाच्या वाहतुकीत समस्या निर्माण होत असत. बैलगाडी, दुचाकी फसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागायचे. त्यातून किरकोळ अपघात होत असत. म्हणून कांदे वस्तीवरील लोक दहा वर्षे मागणी करत होते. परंतु त्यांच्या रास्त मागणीला ग्रामपंचायतीमध्ये केराची टोपली दाखविली जात असे.
कोरोना काळात दहा तरुण शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आपल्या वर्गणीतून दीड किमी रस्ता पूर्ण केला. यामुळे तीस हेक्टर शेती क्षेत्र रस्त्याला जोडले गेले. रस्त्यासाठी लागणारा दगड व मुरूम शेतकऱ्यांच्या विहिरीचा वापरण्यात आला. रस्त्यासाठी सुमारे दीड एकर शेती क्षेत्र कामी आले.