साकोरे गावाजवळील बेहडी नदीपात्रातील रस्ता गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:22 PM2018-08-04T19:22:28+5:302018-08-04T19:22:49+5:30
कळवण : शुक्र वारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. सप्तशृंगगड परिसरातील पावसामुळे मार्कंडपिंप्री लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने बेहडी नदी व नाल्यांना पूर आल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बेहडी नदीवरील साकोरे गावाजवळील सीमेंट बंधाऱ्याचा भरावासह शेतकºयांनी श्रमदानातून केलेला साकोरे येथील रस्ता वाहून गेल्याने साकोरे येथील ५० शेतकºयांचा गावाशी संपर्कतुटला आहे. रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा शेकडो क्विंटल कांदा व शेतमाल शेतात अडकून पडणार आहे.
चणकापूरमधून २१७२ क्यूसेक व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून ४५० ते ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, चणकापूर उजव्या कालव्याला १०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. गोबापूर, नांदुरी, बोरदैवत, धार्डेदिगर, मळगाव चिंचपाडा, भांडणे, खिराड, मार्कंडपिंप्री, धनोली,भेगू, जामलेवणी, ओतूर आदी लघुपाटबंधारे प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असून, पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी नदीला पूर आला आहे. गिरणा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
साकोरे येथील बंधाºयाचा भराव वाहून गेल्याने या बंधाºयाच्या खाली साकोरे येथील ५० शेतकºयांनी श्रमदानातून तयार केलेला रस्ता वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमाल घेऊन जाणे अवघड झाले आहे. साकोरे येथील महादेव मंदिराकडील रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. साकोरे गावाशी संपर्कसाधण्यासाठी व शेतात येणे व जाण्यासाठी नदीपलीकडील ५० शेतकºयांचा आता शिरसमणीमार्गे पायपीट करावी लागणार आहे.
शेतमाल व कांदा बाहेर काढायला रस्ता नसल्याने नदीपलीकडील शेतकºयांचा प्रत्येकी १० ट्रॅक्टर कांदा शेतात अडकून पडणार असल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शिवाय मिरची, टमाटे, घेवडा आदी पिकांसह जनावरे नदीपलीकडे अडकून पडणार आहे. साकोरे येथील गोरख देवरे, आशुतोष आहेर , संदीप आहेर, रमेश आहेर, अभिमन्यू आहेर, सुभाष आहेर, राजाराम देवरे, दौलत आहेर, पोपट आहेर, माणिक देवरे, रामचंद्र देवरे, पंडित देवरे, दादा देवरे, कैलास आहेर, अनिल पवार, राजाराम आहेर, सुरेश आहेर, श्रावण वाघ, रवींद्र पवार, जिभाऊ वाघ, बापू पवार, मंगळू माळी, मोहन पवार, जयराम पवार, शिवदास पवार, शांताराम पवार, पिंटू माळी, कडू आहेर यांच्यासह अनेक शेतक-यांचा कांदा शेतात अडकून पडला आहे.