रस्ते गेले खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:16 PM2017-08-04T23:16:47+5:302017-08-05T00:21:59+5:30
पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.
नाशिक : पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून, अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांकडे संबंधित विभागाने विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी रस्ते दुरुस्त करण्याची गरज आहे. ‘सोनूऽऽ.. तुला सुकेणेच्या रस्त्यावर भरोसा नाय काय.. नाय काय. सुकेणे रस्त्याचे खड्डे कसे खोलऽऽ खोल.. सर्वेकडे कसा झोलऽऽ झोल...’ अशी पोस्ट सध्या कसबे सुकेणेला जोडणाºया रस्त्यांच्या बाबतीत सोशल मीडियावर गाजतेय. तसे पाहिले तर सध्या कसबे सुकेणेला जोडणाºया रस्त्यांची स्थिती अशीच आहे. सर्वत्र खड्डे खोल असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘झोल’ची या पावसाळ्यात पोलखोल झाली आहे. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी गत कसबे सुकेणेला जोडणाºया रस्त्यांची झाली आहे. निफाड तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठेचे गाववजा शहर म्हणून ओळखल्या जाणाºया कसबे-सुकेणेला जोडणाºया रस्त्यांची संख्या तब्बल आठ आहे. यातील ओझर-सुकेणे-पिंपळस आणि कोकणगाव-सुकेणे-चांदोरी हे दोन मार्ग राष्ट्रीय आणि राज्य मार्गांना जोडले जातात.