दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:05 AM2017-10-14T01:05:55+5:302017-10-14T01:06:03+5:30
महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
नाशिक : महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. ‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्रमानिमित्त मविप्र संस्थेच्या अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. खासदार सुळे म्हणाल्या की, कोणत्याही देशात २८ टक्के कर दिला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती. मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खासदार सुळे यांनी याप्रसंगी दिला.
शिवसेना-भाजपाचे भांडण व्हेरी फनी
राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना व भाजपामधील संबंध अत्यंत टोकाला पोहोचल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, सकाळी भांडायचे आणि सायंकाळी सोबत चहा प्यायचा. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या भांडणाकडे आता फारसे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांचे मतभेद म्हणजे आता व्हेरी फनी वाटत असल्याने मीदेखील यावर भाष्य करणे आता सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण बाजीगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा राखून प्रचार केल्यामुळे नांदेडच्या नागरिकांनी त्यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला. या निवडणुकीत शिवसेना, भाजपाने अत्यंत खालच्या थरावर प्रचार केला. राज्यात इतक्या खालच्या थरावर प्रचार कधी पोहोचला नव्हता. राजकीय प्रचाराची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याबाबत खेद वाटत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.