येवला तालुक्यात होतेय लोकसहभागातून रस्ता काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:28 PM2020-08-28T22:28:19+5:302020-08-29T00:07:32+5:30

येवला : तालुक्यातील ३६ नंबर चारी रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केले आहे. ३६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते.

Road work is being done in Yeola taluka through public participation | येवला तालुक्यात होतेय लोकसहभागातून रस्ता काम

येवला तालुक्यातील ३६ नंबर चारी येथे सुरु असलेले रस्त्याचे काम.

Next

येवला : तालुक्यातील ३६ नंबर चारी रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केले आहे. ३६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते.
वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही या रस्त्याने जाणे-येणे मुश्कील होत होते. तर खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीचालकांचे अपघातही झाले होते. परिसरातील शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात रस्त्याअभावी गैरसोय होत होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर परिसरातील चंदू काळे, चंदू देशमुख, संदीप मोरे, अजय पवार, अप्पा मोरे, ज्ञानेश्वर मोरे आदी शेतकरी व ग्रामस्थांनी लोकसहभागातून सदर रस्ता काम पूर्ण केले.

Web Title: Road work is being done in Yeola taluka through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.