श्रीघाट ते टाकेदेवगाव रस्त्याचे काम रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:12 AM2022-02-01T00:12:55+5:302022-02-01T00:13:24+5:30
देवगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट-रायपाडा-टाकेदेवगाव ४.३०० किमी रस्त्याचे काम रखडले असून, ते संथगतीने चालू आहे. सद्यस्थितीत काम बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असून, फक्त रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ तसेच प्रवासी वाहतुकीला अडचण निर्माण होत असून, रस्त्याचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देवगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट-रायपाडा-टाकेदेवगाव ४.३०० किमी रस्त्याचे काम रखडले असून, ते संथगतीने चालू आहे. सद्यस्थितीत काम बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असून, फक्त रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ तसेच प्रवासी वाहतुकीला अडचण निर्माण होत असून, रस्त्याचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते श्रीघाट (रायपाडा) ते टाकेदेवगाव या नवीन मार्गावरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, अद्याप हा रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीस सज्ज झाला नसून, रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. या रस्त्यावर मुरुम पसरलेला असून, रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले दिसत आहेत. मात्र, आता पुढील काम कशात अडले, असे वाहतूकदारांकडून बोलले जात आहे.
श्रीघाट-टाकेदेवगाव रस्त्याकरिता अंदाजित रक्कम ३१३. ९४ लक्ष खर्च असून, विशाल कंन्स्ट्रुवेल, नाशिक या कंत्राटदार कंपनीने काम करण्याचे कंत्राट घेतले आहे. हे काम बारा महिन्यांत पूर्ण करून देण्याचा कालावधी आहे. मात्र, काम सुरू होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. आता करारानुसार फक्त दोन महिने शिल्लक असून, घाईघाईने काम केल्यास दर्जेदार काम होईल की नाही, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील वाड्या-पाड्या व वस्तीतील लोकांना दळणवळणाची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने श्रीघाट ते टाकेदेवगाव (रायपाडामार्गाने) रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, अचानकपणे रस्ता कामाला खोडा बसला असून, रस्त्याचे काम अपूर्णच राहिले आहे. तरी संबंधितांनी रस्त्याच्या कामाला गती देऊन पूर्णत्वास नेण्याची मागणी श्रीघाटसह टाकेदेवगाववासीय करत आहेत.
देवगाव-श्रीघाट रस्त्याची ह्यधूळह्णधाण...
त्र्यंबकेश्वर-पहिने- देवगाव, त्र्यंबकेश्वर-देवगाव-घोटी या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळून मुहूर्त मिळाला आहे. तसेच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र, देवगाव ते श्रीघाट या तीन किलोमीटरच्या रस्त्याची वर्कऑर्डर कुठे अडकली, असा सवाल प्रवासी करत आहे. या तीन किमी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, दररोजच्या वर्दळीच्या वाहतुकीमुळे रस्त्याची ह्यधूळह्णधाण झाली आहे.
श्रीघाट-रायपाडामार्गे टाकेदेवगाव रस्त्यावर खडी टाकायचे काम चालू आहे; पण फक्त रोडच्या कडेला टाकायचे काम चालू आहे आणि अतिशय संथ गतीने चालू आहे. मागच्या वर्षीपासून काम चालू आहे. श्रीघाट फाटा ते टाकेदेवगावपासून एक किलोमीटर रस्ता केला होता. परंतु, पुढचा उरलेला रस्ता अपूर्ण आहे आणि केलेला रस्ता निघून गेला आहे.
- वसंत इरते, वाहनचालक, रायपाडा.