नांदगाव तालुक्यात रस्त्याच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:55 PM2018-11-02T23:55:29+5:302018-11-02T23:55:42+5:30
नांदगाव : पंचक्रोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा साकोरा पांझण-जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावांतील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेचे, ११.८९ किलोमीटर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाल्याचे प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने समाधानाचे वातावरण पसरले आहे.

काम पूर्ण झाल्यावर पुढील ५ वर्षे देखभाल दुरु स्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. भौगोलिकदृष्ट्या मालेगावशी जोडणारा जवळचा मार्ग असल्याने चाकरमान्यांमध्ये समाधानाची भावना पसरली आहे. लोकाभिमुख कामे मंजूर करून लोकांची होणारी गैरसोय टाळल्याबद्दल लक्ष्मण बोरसे, देवदीास पगार, अमोल पगार, संदीप पगार, नारायण पाटील, मुन्ना इनामदार, किरण गवळे, शरद सोनवणे, प्रल्हाद मंडलिक व ग्रामस्थांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले व कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.सनदशीर मार्गाने अनेकवेळा केलेले रास्ता रोको, आमरण उपोषण व सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत नसल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने दाखवलेली हतबलता तसेच आपल्या कार्यकक्षेतील बाब नसल्याने पदाधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे संबंधित यंत्रणेकडून साध्या खड्डे बुजविण्याच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्याने ईर्षेने पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयापर्यंत केलेला पत्रव्यवहार व त्यास जिल्हाधिकाºयांनी दिलेला भक्कम प्रतिसाद यास अखेर यश आले आहे.