रस्त्यांचे काम रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:18 PM2020-07-27T21:18:54+5:302020-07-27T23:28:19+5:30
आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण केल्यास दळणवळणाची मोठी सोय होऊन त्यामुळे विकासाला हातभार लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आडगाव : नाशिक महापालिकेच्या हद्दीतील व राष्टÑीय महामार्गावरील आडगाव परिसराला रिंगरोडचे मोठे जाळे प्रस्तावित असून, त्यातील अनेक रस्त्यांचे कामे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत, परिणामी परिसराचा विकास खुंटला आहे. महापालिकेने आडगाव व परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण केल्यास दळणवळणाची मोठी सोय होऊन त्यामुळे विकासाला हातभार लागण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
महामार्गालगत असलेल्या आडगाव या परिसरात ग्रामीण पोलीस मुख्यालय, पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत, समाज कल्याण वसतिगृह, वैद्यकीय महाविद्यालय तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे राहिले आहे. मनपाच्या जुन्या विकास आराखड्यानुसार आडगावच्या रहिवासी क्षेत्रांत असलेल्या अंतर व बाह्य रिंगरोड दर्शविण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते अद्यापही कागदावरच आहेत. मुंबई-आग्रा महामागार्पासून जुना जानोरी रस्ता जात असून, या रस्त्यावरच न्यू इंग्लिश स्कूल, समाज कल्याण वसतिगृह, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाºया म्हाडाच्या वसाहतीजवळून जातो या मार्गावरच आडगावातील दशक्रियाविधीशेड आहे. पण हा रस्ता अतिशय अरुंद असून, या रस्त्यावर नेहमी विद्यार्थी व स्थानिकांची वर्दळ असते. परंतु रस्त्याअभावी म्हाडाची नागरी वसाहत व मळे परिसरातील रहिवाशांना जाताना-येताना त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी धार्मिक कार्यक्रमांसाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी व या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. महामार्गावरून जाणाºया जुन्या जानोरी रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अनेक महत्त्वाचे कार्यालये, शासनाच्या योजना या रस्त्यावर असून, नवीन नागरी वसाहतही विकसित होत आहे. मात्र रस्त्याच्या रुंदीकरणाअभावी त्रास सहन करावा लागत आहे.
- रामभाऊ जाधव,
सामाजिक कार्यकर्तेरस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावेमहामार्गाकडून न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणाºया मार्गावर शाळा, समाज कल्याणचे मुलांचे वसतिगृह , बहुचर्चित म्हाडाच्या सदनिकांचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प, एस.एस.सी. बोर्डाचे कार्यालय शिवाय पुढे नागरी वसाहत आहे. म्हाडाच्या शेजारी दशक्रि या विधी असे धार्मिक विधी होत असतात. तसेच म्हाडाची नागरी वसाहत व मळे परिसरातील रहिवाशांना जाताना येतांना त्रास होतो. त्यामुळे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी धार्मिक कार्यक्र मांसाठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी व या रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.