आर्थिक देवाणघेवाणवरून रखडले रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:14+5:302021-02-09T04:16:14+5:30
महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण ...
महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २४ मधील नगरसेवकांच्या निधीतून सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाला मागील वर्षी सुरुवात केली होती. प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे यांच्या नगरसेवक निधीतून हे काम सुरू करण्यात आले आहे. अर्धा रस्ता झाल्यानंतर एका शेतकऱ्याने हरकत घेतली असून, त्याला मोबदला देण्यावरून स्थायी समितीत विषय पटलावर आल्यानंतर सदरचा विषय हा आर्थिक देवाणघेवाणीवरून अडल्याचे बोलले जात आहे. बडदेनगर ते पाटीलनगरचा रस्ता झाल्यानंतर कामगारांना या रस्त्याने अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता होणार आहे. तसेच सिडको भागातील नागरिकांनादेखील या रस्त्याने ये-जा करणे सोपे होणार असल्याने हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
चौकट
बडदेनगर ते पाटीलनगर दरम्यानचा रस्ता हा शेतकऱ्यांना मोबदला देण्यावरून रखडला असून, अर्धवट झालेल्या रस्त्याचा फायदा मद्यपी घेत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत या रस्त्यालगत मद्यपींचा वावर वाढला असून, सदरचा रस्ता हा मद्यपींचा अड्डा झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नागरिक फिरायवास जाताना या रस्त्याच्या कडेला मद्याच्या बाटल्यादेखील पडलेल्या असल्याचे दिसून आले. यामुळे या ठिकाणी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चौकट.....
बडदेनगर ते पाटीलनगर रस्ता हा केवळ आर्थिक देवाणघेवाणवरून रखडला असल्याचे बोलले जात असून, मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फोटो
०८रस्ता फोटो