दोन महिन्यांपासून रखडले रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:13+5:302021-01-18T04:13:13+5:30
देवळालीगाव पाटील गॅरेजजवळ चंदनवाडी येथील रस्त्याची उंची कमी करण्यासाठी महापालिकेने २८ नोव्हेंबरला रस्ता खोदाई करून कामास सुरुवात केली. दहा ...
देवळालीगाव पाटील गॅरेजजवळ चंदनवाडी येथील रस्त्याची उंची कमी करण्यासाठी महापालिकेने २८ नोव्हेंबरला रस्ता खोदाई करून कामास सुरुवात केली. दहा ते पंधरा दिवसांचे काम होते. मात्र दोन महिने होऊनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. नागरिकांनी मनपा बांधकाम विभागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विचारणा केली असता आठवड्याभरात रस्त्याचे काम पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर कच टाकण्यात आली असून, काँक्रीटीकरण करणार असल्याचे सांगण्यात येत होते. आता डांबरीकरण करणार असे सांगण्यात येत आहे. समपातळीपासून रस्ता हातभर खाली आहे. रस्ता कामाबाबत नोटीस लावलेली नाही. त्यामुळे रात्री येथे अपघात होऊ शकतो. दोन महिन्यांपासून खासगी रस्त्यातून सध्या जावे लागत आहे. खासगी रस्ताही खराब आहे. काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (फोटो १७ नाशिकरोड)