बागलाण तालुक्यात रस्त्यांना काटेरी झुडपांचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:36+5:302021-08-19T04:18:36+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाकडे कोणतेही संबंधित लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांनी लक्ष दिलेले नाही. ...
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाकडे कोणतेही संबंधित लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी यांनी लक्ष दिलेले नाही. रस्त्याचे गेल्या काही वर्षांपूर्वी काम करण्यात आले होते. यावेळी संबंधित ठेकेदार यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या चाऱ्या काढल्या नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस काटेरी झुडपांनी वेढा घातला आहे. रस्त्याने जाणारे वाहनधारक यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच लहान - मोठे अपघात होण्याची शक्यता असून, या रस्त्याची संबंधित विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करावी व रस्त्याच्या दोन्ही बाजूला आलेली काटेरी झुडपे काढून टाकावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व वाहनधारक यांनी केली आहे. वीरगाव गटातील जिल्हा परिषद सदस्यांकडे येथील परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली. परंतु त्यांनीही दखल घेतली नसल्याने जोरण येथील युवा शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर जोरण ते दहिंदुले या रस्त्याच्या कामाचा मुहूर्त संबंधितांना कधी सापडणार, असा प्रश्नही येथील जनतेस पडला आहे.
इन्फो
दिशादर्शक फलकाची मागणी
जोरण गावाच्या पश्चिम बाजूस एक रस्ता कपालेश्वर, पठावा आदी गावांना जातो तसेच एक रस्ता दहिंदुले, डांगसौंदाणे या गावांकडे जात असून, जोरण गावाच्या पश्चिम बाजूस दिशादर्शक फलक बसविण्याची मागणीही केली जात आहे. दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणारे वाहनधारक यांची दिशाभूल होत असून, विनाकारण वाहनधारकांना त्रास सोसावा लागत असल्याचे महेंद्र सावकार, नितीन सावकार, प्रवीण सावकार, दिनेश सावकार, खुशाल बेडीस, भाऊसाहेब बेडीस, किरण सावकार, तुषार सावकार आदींनी म्हटले आहे.
फोटो- १८ बागलाण
जोरण ते दहिंदुले रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा वेढा.
180821\18nsk_20_18082021_13.jpg
फोटो- १८ बागलाणजोरण ते दहिंदुले रस्त्याला पडलेला काटेरी झुडपांचा वेढा.