शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:20 AM2019-12-01T00:20:35+5:302019-12-01T00:21:34+5:30

मनमाड : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर विकास आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

The roads in the city should be stopped | शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवावी

मनमाड पालिका प्रशासनाला निवेदन देताना शहर आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, संतोष बाकलीवाल, राजकमल पांडे, नरेंद्र कांबळे, एस.एम. भाले आदी.

Next
ठळक मुद्देमनमाड : शहर विकास आघाडीची प्रशासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शहरातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर विकास आघाडीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्ते दुरुस्तीबाबत कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. जे रस्ते काही दिवसांपूर्वी माती टाकून दुरुस्त केले होते ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ते पुन्हा उखडले आहे.
रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहने चालवणे तसेच पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे अनेक पायी चालणारे नागरिक घसरून पडले आहेत, तर खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना मानेचे व कमरेचे त्रास सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तरी प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन शहरातील रस्त्यांची तत्काळ दुुरुस्ती करावी अन्यथा शहर विकास
आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, सचिव नरेंद्र कांबळे, कार्याध्यक्ष संतोष बाकलीवाल, राजकमल पांडे, एस.एम. भाले, सलीम सोनावाला आदी उपस्थित होते.खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना मानेचे व कमरदुखीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन शहरातील रस्त्यांची तत्काळ दुुरुस्ती करावी अन्यथा शहर विकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The roads in the city should be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.