देवळाली कॅम्पचे रस्ते झाले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:47+5:302021-06-06T04:11:47+5:30
कोविड काळात जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे देवळालीतील काही रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र १ जूनपासून निर्बंध कमी झाले ...
कोविड काळात जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे देवळालीतील काही रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र १ जूनपासून निर्बंध कमी झाले तरी रस्ते खुले झाले नव्हते. त्यामुळे भगूरमार्गे देवळाली कॅम्पमध्ये येणाऱ्यांसाठी आनंद रोड, तर शिगवे बहुला परिसरातील जनतेला डेअरी फार्ममार्गे यावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढून इंधन खर्च वाढत होता. याशिवाय या भागातून रिक्षातून प्रवास करताना जास्तीचा खर्च होत होता. ही बाब लक्षात घेऊन माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, भाजपचे जीवन गायकवाड, संतोष मेढे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेऊन वास्तविकता लक्षात आणून दिली असता, प्रशासनाने तातडीने देवळाली कॅम्प पोलिसांच्या मदतीने छावणी परिषदेच्या समोरील, तसेच हौसन रोडवरील बॅरिकेड हटविले.