मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:56 PM2022-05-18T22:56:45+5:302022-05-18T22:57:27+5:30

मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

Roads in Malegaon to be paved before monsoon | मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात

मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा स्थायी समितीने दिली कामांना मंजुरी

मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार वाजता स्थायी समिती सभागृहात बैठक झाली.

या बैठकीत शहरातील लाखो रुपयांच्या रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जुना आग्रा रोड ते जमल खटके यांच्या घरासमोरून बेकरीपर्यंत सिमेंट रस्ता, मदिना कट पिस सेंटर जवळचा सिमेंट रस्ता, जुना रिमांड रस्ता, व्हावळकर रुग्णालय ते शाहूनगरपर्यंत सिमेंट रस्ता, यासह इतर रस्ता कामाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. विषयपत्रिकेवरील सहा विषय तहकूब करण्यात आले. व्यपगत निधी परत करण्याचे दोन विषय मंजूर करण्यात आले. महापालिकेच्या महापालिकेच्या रुग्णालयांना औषध साठा व उपकरणे पुरवण्याची निविदा नामंजूर करण्यात आली. वारंवार त्याच मक्तेदाराला मक्ता कसा द्यायचा असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केल्याने हा विषय तहकूब करण्यात आला. तसेच स्टेशनरी पुरवठा निविदा तहकूब करण्यात आली. बैठकीला समिती सदस्य रजिया बेगम, नसरीन शेख,फैमीदा कुरेशी,मुस्तकीम डिंगणिती , सखाराम घोडके, छाया शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Roads in Malegaon to be paved before monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.