रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:24 AM2020-01-10T00:24:19+5:302020-01-10T00:24:34+5:30

इंदिरानगर : वडाळा-नासर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची ...

Roads on the Nadu Stu vehicles | रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या

रस्त्यावर नादुरु स्त वाहनांचा ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक कोंडी : नासर्डी पूल ते वडाळानाका दरम्यान अडथळा

इंदिरानगर : वडाळा-नासर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळानाका ते पाथर्डी गाव लाखो रुपये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले, त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, परबनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगरीसह विविध उपनगरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सुरळीत मार्ग तयार झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते.

रस्ता मोकळा करण्याची मागणी
नासर्डी नदी पूल ते वडाळानाका दरम्यान रस्त्यावरच चारचाकी नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीचा रस्ता अरु ंद पडत आहे. यामुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत आहे. संबंधित विभागाने जीवितहानीची वाट न बघता रस्त्यावर पडून असलेली नादुरुस्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Roads on the Nadu Stu vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.