पायी दिंड्यानी नायगाव खो-यातील रस्ते फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 03:19 PM2020-01-15T15:19:14+5:302020-01-15T15:20:42+5:30

नायगाव - संतश्रेष्ठ निव्रूत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी जाणार्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथिल पायी दिंडीचे जायगाव ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.त्रंबकेश्वरकडे निघालेल्या पायी दिंड्यांनी नायगाव खो-यातील रस्ते फुलून गेले आहे.

 Roads in the Nayagaon Valley flooded the steps | पायी दिंड्यानी नायगाव खो-यातील रस्ते फुलले

  - टाळ-मुदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम....निव्रुत्तीनाथ महाराज की जयचा ज-घोष करत सध्या पायी दिंड्या त्रंबकेश्वरच्या दिशेने निघाल्या आहे.सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथिल गणपत महाराजांच्या दिंडीचे जायगाव येथे घेतलेले छायाचित्र. 

Next
ठळक मुद्दे बुधवारी दुपारी देवपुर येथील भागवत महाराजांच्या पायी दिंडीचे स्वागत गोदा युनियनचे संचालक दगु शंकर दिघोळे यांनी स्वागत केले.दिंडीतील वारक-यांच्या भोजनाची दिघोळे यांनी व्यवस्था केली.जायगाव ब्राम्हणवाडे रस्त्याने जाणाऱ्या दिंड्याचे अनिल काकड,पांडुरंग दौंड,अण


खडांगळी येथिल श्री दत्त नवनाथ आश्रम ते त्रंबकेश्वर या पायी दिंडीचे मंगळवारी सायंकाळी जायगाव येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.दिंडी आयोजक तथा सिन्नर तालुका वारकरी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.गणपत महाराज कोकाटे यांचे ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.गेल्या चौतीस वर्षांपासून या दिंडीचा मुक्काम असलेल्या जायगाव येथे वारक-यांची जेवण,नाश्ता व रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी हरिपाठ,किर्तन,भजन व काकडा आदी धार्मिक कार्यक्र म यावेळी पार पडले.बुधवारी सकाळी या दिंडीने हरिनामाच्या जय घोषात त्रंबककडे प्रस्थान केले.
 
  अनोख्या भोजनाचा आस्वाद.....
गावातील प्रत्येक घरातून भाजी व भाकरी जमा केली जाते. या विविध प्रकारच्या भाज्यांना एकत्र करून त्यांना नव्याने फोडणी देऊन भाजी तयार केली जाते.या मिक्स भाजी भाकरी बरोबर मिरचीचा ठेचा व कांदा असे अस्सल गावरान भोजन वारक-यांना दिले जाते. गेल्या चौतीस वर्षांपासून जायगाव ग्रामस्थांच्या या अनोख्या भोजनाने गणपत महाराजांच्या दिंडीतील वारकरी तुप्तीचा ढेकर देत आपले प्रस्थान ठेवतात.

Web Title:  Roads in the Nayagaon Valley flooded the steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.