पूनद खोऱ्यातील रस्ते होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:27 PM2018-10-27T13:27:37+5:302018-10-27T13:27:49+5:30
देसराणे :- कळवण तालुक्यात पुनद खोºयातील रवळजी फाटा ,देसराणे ,जयदर रस्ता चकाचक होणार असून रस्त्यांना झळाळी मिळणार आहे.
देसराणे :- कळवण तालुक्यात पुनद खोºयातील रवळजी फाटा ,देसराणे ,जयदर रस्ता चकाचक होणार असून रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरिक, प्रवासी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षापासून पाठदुखीचे सारखे आजार लागलेल्या वाहन धारकांनी रस्त्याचे काम सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. रवळजी फाटा ते देसराणे जयदर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्याला शेवटी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी मंजूर झाला . कामास प्रारंभ झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खेडगांव रवळजी फाटा देसराणे मोहबन जयदर या संपूर्ण रस्त्याला एकुण साडे सहा कोटींचा निधी उपलब्ध झाला. रवळजी फाटा ते देसराणे, जयदर रस्त्यावर एकूण २७ पाईप मोºया , चार छोटे पुल , ३०० मीटर कॉंक्र ीट रास्ता , ९७०० कि.मी. डांबरी रस्ता असा एकूण दहा कि.मी. लांबीचा रस्ता मंजूर आहे.