लष्करी प्रशासनाने पर्याय देऊनच रस्ते बंद करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:13 PM2020-08-27T22:13:41+5:302020-08-28T00:38:29+5:30
देवळाली कॅम्प : वर्षानुवर्ष वहिवाटीचे असलेले रस्ते कॅन्टोंमेंट व लष्करी प्रशासनाने बंद करण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगे. जे एस गोराया यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : वर्षानुवर्ष वहिवाटीचे असलेले रस्ते कॅन्टोंमेंट व लष्करी प्रशासनाने बंद करण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगे. जे एस गोराया यांच्याकडे केली आहे.
येथील विजय नगर भागात लष्करी विभागाचे वतीने आॅक्टोबर नंतर रस्ते बंद चा फ़लक लावल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या पार्श्वभूमीवर खा गोडसे, नगरसेवक बाबुराव मोजाड, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, तानाजी भोर, विलास आडके, अशोक आडके आदींच्या शिष्टमंडलाने ब्रिगरेडिअर गोराया यांची भेट घेतली.याावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, देवळाली कॅम्पच्या लष्करी हद्दीतून अनेक वाहतूक होत असते तसेच येथे मोठी बाजारपेठ असल्याने अनेक नागरिक ये जा करीत असतात,. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिंगवे बहुला ते स्मशानभूमी , भगूर उड्डाण पुलाकडून नानेगावकडे जाणारा रस्ता , विजयनगर येथील आर्क, सहयाद्री व इतर सोसायटी कडे जाणारे रस्ते दि. ३१ आॅक्टोबरनंतर बंद करण्यात येणार असल्याचे फलक लावले आहेत,वास्तवीक आज सरंक्षण विभागाकडे असलेली सर्वच जागा शेतक - यांचीच होती. देश हितासाठी त्यांनी दिलेली आहे. मात्र त्यांचे वहीवाटीचे रस्ते बंद करू नये असे पूर्वीं पासून ठरलेले आहे,आजपर्यंत ते चालत आलेले असताना आत्ता रस्ते बंद केले तर ते अन्यायकारक होईल, यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. या बाबत ब्रिगे. गोराया यांनी देखील सकारात्मकता दर्शविली व यावर निश्चित तोडगा काढला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.