बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:11 PM2020-02-02T23:11:36+5:302020-02-03T00:22:40+5:30

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वटार फाटा ते कंधाणे फाटादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून नियमित प्रवास करणारे वाहनधारक पाठदुखीसारख्या आजाराने त्रस्त आहेत.

Roads in the west of Baglan | बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात रस्त्यांची दुरवस्था

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात रस्त्यांची दुरवस्था

Next
ठळक मुद्देअपघातात वाढ : वटार ते कंधाणे फाटादरम्यान वाहनचालकांची कसरत

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वटार फाटा ते कंधाणे फाटादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून नियमित प्रवास करणारे वाहनधारक पाठदुखीसारख्या आजाराने त्रस्त आहेत.
वटार फाटा ते कंधाणे फाटा दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तालुक्याच्या गावाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ असते. दररोज १० ते १५ गावांतील लहान-मोठी वाहने या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे टाळण्याच्या बेतात अनेक छोटे-मोठे अपघातही होत आहे. हा रस्ता सटाणा शहराला जाण्यासाठी जवळचा असल्याने या भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. शेतकरी याच मार्गाने विक्रीसाठी माल सटाण्याला घेऊन जातात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कसरत करावी लागत आहे.

कपालेश्वर येथे येणाºया भाविकांना सोयीचा मार्ग
उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखल्या जाणाºया कपालेश्वर येणाºया भाविकांनासुद्धा हाच मार्ग असल्यामुळे अनेक भाविक श्रावण महिन्यात येथे येण्याचे टाळतात. तसेच परिसरातील नागरिकांना दैनंदिन दळणवळणासाठी हाच रस्ता असल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. सदर रस्ता लवकरात लवकर दुरु स्त व्हावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकरी करीत आहेत.

कंधाणे फाटा ते वटार फाटा या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. वाहनचालकांना टाळण्याच्या बेतात कायम छोटे-छोटे अपघात होत असतात. याची बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरु स्ती करावी.
- प्रशांत बागुल
माजी सरपंच, वटार

Web Title: Roads in the west of Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.