रस्त्यावरची भटकंती अँटिजेन चाचणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:21+5:302021-04-18T04:14:21+5:30

शहरात संचारबंदी आदेशाची शनिवारी काटेकोरपणे अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात आली. परिमंडळ-१, परिमंडळ-२च्या अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बॅरिकेडिंग करत पोलिसांनी ...

Roadside antigen test ... | रस्त्यावरची भटकंती अँटिजेन चाचणी...

रस्त्यावरची भटकंती अँटिजेन चाचणी...

Next

शहरात संचारबंदी आदेशाची शनिवारी काटेकोरपणे अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात आली. परिमंडळ-१, परिमंडळ-२च्या अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बॅरिकेडिंग करत पोलिसांनी भटक्यांवर दंडात्मक कारवाई केली. अत्यावश्यक सेवेची अस्सल खरीखुरी कारणे सांगणाऱ्यांची पडताळणी करत याेग्य पुराव्यांद्वारे शहनिशा करून त्यांना सोडण्यात आले; मात्र जे बनावट कारणे सांगत होते अशा सर्वच भटक्यांवर दंडात्मक कारवाईसह अँटिजेन चाचणीही करण्यात आली. यामध्ये सातपूर, मुंबईनाका, भद्रकाली, पंचवटी, उपनगर, आडगाव, म्हसरुळ, इंदिरानगर, अंबड अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मुख्य रस्त्यांवर नाकाबंदीच्या पॉइंटवर मनपाच्या वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने ‘सुपर स्प्रेडर’ शोधण्याची मोहीम राबविली. यामध्ये सुमारे अर्धा डझन कोरोनाबाधित व्यक्ती बिनबोभाटपणे रस्त्यांवरून भटकंती करताना पोलिसांना सापडले. त्यांची कोविड केअर सेंटरमध्ये तत्काळ रवानगी करण्यात आली.

---इन्फो---

पोलीस ठाणेनिहाय झालेल्या चाचण्या अशा...

शहरात भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक ४७ लोकांची अँटिजेन चाचणी संध्याकाळपर्यंत करण्यात आली. त्यापैकी दोन कोरोनारुग्ण आढळून आले.

मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत भारतनगर (वडाळा रोड), चांडकसर्कल या ठिकाणी अँटिजेन चाचणी करण्यात आली. दुपारपर्यंत एकूण ३१ संशयित भटक्यांची चाचणी केली गेली. यामध्ये १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून मंगेश कुवर, विलास गणते यांनी यासाठी परिश्रम घेतले. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत ३९ लोकांची चाचणी करण्यात आली; मात्र सुदैवाने एकही व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आली नाही. म्हसरुळ, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ११ लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले.

Web Title: Roadside antigen test ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.