गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

By Admin | Published: February 2, 2016 11:51 PM2016-02-02T23:51:20+5:302016-02-02T23:51:39+5:30

गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

The robbery | गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

googlenewsNext

नाशिक : रेल्वेतील प्रवाशांना प्रसाद वा जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटणारा सराईत चोरटा अशोक रामदास चौधरी (५९, रा. रावेर, जि. जळगाव, हल्ली मुक्काम विटभट्टीजवळ, विहितगाव) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अशोक चौधरी हा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना हेरून प्रसाद वा जेवणातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील किमती ऐवज चोरून नेत असे़ छत्तीसगड येथील बावीस वर्षीय युवक नीलमकुमार पवनसिंग यादव यास रायपूरला जायचे असल्याने ६ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभा होता़
आरोपी चौधरीने यादवसोबत संवाद साधत आपल्यालाही रायपूरला जायचे आहे असे सांगितले़ तसेच जेवणानंतर आपण सोबतच तिकीट काढू असे सांगत त्याला जेवण दिले़; मात्र दोन-तीन घासानंतरच यादव बेशुद्ध पडला व चौधरीने त्याच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य व रोकड असा ४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ यानंतर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या यादवला रात्री दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले़
दोन दिवसांनी शुद्धीवर आलेल्या यादवने रेल्वे पोलिसांकडे धाव घेऊन आपल्याबाबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश नागरे यांनी रेल्वेस्थानक परिसरातून आरोपी चौधरीस अटक केली होती. तसेच त्याच्याकडील जेवणाच्या डब्यात गांजामिश्रित पोळ्या आढळून आल्या होत्या़ या प्रकरणी चौधरीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ (प्रतिनिधी)

Web Title: The robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.