भरदिवसा नाशिक शहरात सराफाच्या दुकानावर दरोडा; ३० तोळे सोने लुटून पोबारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:47 IST2025-02-17T18:47:15+5:302025-02-17T18:47:33+5:30
दुपारी २वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ न्हवती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. दोघे दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता.

भरदिवसा नाशिक शहरात सराफाच्या दुकानावर दरोडा; ३० तोळे सोने लुटून पोबारा
नरेंद्र दंडगव्हाळ -
नाशिक : येथील सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या 'श्री ज्वेलर्स' या दुकानात दोन तरुण दरोडेखोर सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले. दुकानात असलेल्या दाम्पत्यावर पिस्तूल रोखून धरले. दुकानातील मांडण्यमध्ये असलेले सर्व सोन्याचे दागिने गोणीत भरून कॉलनी रस्त्याने पळ काढत पुढे दुचाकीने पसार झाले.
दुपारी २वाजेच्या सुमारास परिसरात फारशी वर्दळ न्हवती. सराफी दुकानाच्या आजूबाजूला असलेली लहान दुकानेही बंद होती. दोघे दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता.
दुकान मालक दीपक घोडके व त्यांची पत्नी मनीषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील 30 तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केले. यावेळी त्यांनी मराठीतुन आपआपसांत संवाद साधला, असे मनीषा घोडके यांनी सांगितले. हे दोघे परिसरातील सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.