‘कॅरिबॅग’ कारवाईत ग्राहकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:38 AM2019-07-30T00:38:59+5:302019-07-30T00:39:22+5:30
प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे.
सिडको : प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने परिसरात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु या कारवाईत मनपाच्या एका स्वच्छता निरीक्षकाने चक्क काही व्यावसायिकांकडून अधिक रक्कम घेत काहींनी दंडाच्या कमी रकमेच्या पावत्या दिल्या तर काहींना मात्र दंडाची पावती न देता दुकानदारांकडून दंड वसूल केला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे मनपाच्या या कारभारामुळे व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या आदेशानुसार व विभागीय स्वछता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. १ जुलै ते २७ जुलै या कालावधीत १२२ व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु यात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे.
विभागीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मनपाशी संंबंधित कामकाजाबाबत विभागीय अधिकाºयांचे लक्ष असणे गरजेचे आहे. परंतु त्यांचे याकडे लक्ष नसल्याने कर्मचाºयांकडून प्लॅस्टिक कॅरिबॅगबाबत करण्यात येत असलेल्या कारवाईत व्यावसायिकांकडून कमी पावतीच्या बदल्यात अधिक रक्कम वसूल करून व्यावसायिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.