माणिकखांब शिवारात चाकुचा धाक दाखवून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:31 PM2020-08-19T16:31:59+5:302020-08-19T16:35:52+5:30

घोटी - मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब शिवारात नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनर चालकास रात्रीच्या सुमारास मारहाण करून चाकूचा धाक दाखवून तीन हजार रुपये लुटले. घोटी पोलिसांनी काही तासातच तपासाची चक्रे फिरवत संशयित दोघांना ताब्यात घेतले. याबाबत संशयितांनी गुन्हाची कबुली दिली त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून या दोघा सराईत संशयितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Robbery in Manikkhamb Shivara by showing fear of knife | माणिकखांब शिवारात चाकुचा धाक दाखवून लूट

माणिकखांब शिवारात चाकुचा धाक दाखवून लूट

Next
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : काही तासातच मुद्देमालासह दोघांना अटक

घोटी - मुंबई आग्रा महामार्गावर माणिकखांब शिवारात नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या कंटेनर चालकास रात्रीच्या सुमारास मारहाण करून चाकूचा धाक दाखवून तीन हजार रुपये लुटले. घोटी पोलिसांनी काही तासातच तपासाची चक्रे फिरवत संशयित दोघांना ताब्यात घेतले. याबाबत संशयितांनी गुन्हाची कबुली दिली त्यांच्याकडून लुटलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून या दोघा सराईत संशयितांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
१६ आॅगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास इंदोर येथून मुंबईकडे जाणारा कंटेनर ( एमपी०९- एचएच ०२२८) हा मुंबई - नाशिक महामार्गावर माणिकखांब शिवारात नादुरुस्त झाल्याने थांबला होता. याच दरम्यान दोन युवक एमएच -०५/बिएन-१४०६ या मोटारसायकलवर आले त्यांनी कंटेनरच्या कॅबिन मध्ये घुसून कंटेनरचालक मनोज श्रीराम रतन यादव (रा इंदोर,उ प्र) यास बेदम मारहाण केली, चाकूने दुखापत करून चालकाच्या खिशातील तीन हजार हिसकावून घेऊन पलायन केले. या घटनेची माहिती घोटी पोलिसांना मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ आरती सिंग, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर उपअधीक्षक अरुंधती राणे यांच्या मार्गदशर्नाखाली घोटीचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक संजय वाघमारे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासातच या घटनेतील दोन्ही संशयित लुटारू युवकांना जेरबंद केले त्त्यांच्याकडून तीन हजार रुपये जप्त केले.
गोकुळ फुलचंद गांगड (१९), किशोर दिलीप गांगड (२२) दोघेही रा माणिकखांब ता इगतपुरी अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक संजय वाघमारे शीतल गायकवाड, साळवे, मथुरे, प्रकाश कासार, नितीन भालेराव आदी करीत आहेत.

Web Title: Robbery in Manikkhamb Shivara by showing fear of knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.